Tuesday, November 18, 2008

पावसाळा

यंदाचा पावसाळा मला वेड लावून गेला
तिच्या येण्याची एक आस लावून गेला
नकळत माझ्या श्वासात एक श्वास देऊन गेला
थेंबा थेंबात विश्वास देऊन गेला

कोण असेल ती ?
कशी असेल ती ?
बरेच नव्हे प्रश्न देऊन गेला
यंदाचा पावसाळा मला वेड लावून गेला

जाता जाता मला काही थेंब
उसने देऊन गेला
गोड गोड विचारात मलाबुडवून गेला
होता तो मुसळधार, पण मला
अलगद भिजवून गेला

यंदाचा पावसाळा मला वेड लावून गेला...
यंदाचा पावसाळा मला वेड लावून गेला...


अनुप सोनवणे