
मी तो सूर्य नाही जो सायंकाळी मावळेल
मी तो चंद्र नाही जो नभात दिसेल
मी एक विश्वास आहे जो नेहमी सोबत राहील
मी एक श्वास आहे जो नेहमी हृदयात राहील
मी तो इंद्रधनुष्या नाही जो फक्त पावसात दिसेल
पाऊस नसला तरी माझा गारवा सोबत असेल
मी तो बेभान वारा नाही जो सगळा काही संपवेल
मी एक शांत चालणारी हवा आहे जी सॅग्ला काही सांगेल
मी नाही मोगरा आणि गुलाबाचचा गंध
मी आहे ओल्या माती चा सुगंध
माझा त्या चंदयांशी काही संभंध नाही ज्या
फक्त रात्रीच चमकतात
माझ्या आठवणी तर अश्रूंच्या पावसात भीजतात
मी सोबत असल्याचा तुला नेहमी हुईल भास
कारण मी आहे एक विश्वास
मी आहे एक विश्वास
अनुप सोनावने