Wednesday, June 3, 2009

लिलाव


या निष्पापी बाजारात माझ्या शरीराचा लीलव करून ,
पैशे मोजले जातात .
अश्रूंनी ठस ठसलेल्या माझ्या शरिराने,
मौज मस्ती चे खिशे भरले जातात .

मी वैश्या नवते, हो खरच ,
मे वैश्या नवते,

कधी तरी मी पण शाळा सुटल्यावर घरी जाताना,
प्राजक्ताकताचे फूल वेचायचे.
संध्याकाळी दिवा लावताना मी शुभंम करोती ,
म्हणायचे .

आठ वाजले, की बाबांची वाट बघत दारात
बसून राहायची .
पाऊस पडला कधी ,तर मी मैत्रीण सोबत चिंब
भिजयची.

आणि आत्ता, आठ वाजले रे वजले
आणि आत्ता ,आठ वाजले रे वजले

की सुरू होतो माझ्या शरीराचा लीलाव.
मृत्यू ला जवळून बघण्याचा ,
सुरू होतो पुन्हा एक सराव.

माणूस माणसाला विकून खातोय,
पैश्याच्या पुरणपोळीला माणुसकीची,
आमटी तोंडी लावून खातोय .

ज्या बपाची मी वाट बघायचे ,
त्यानेच मला विकून खाल्ल.
दुखाच्या विहिरित मला सरळ ढकलून दील.

मी स्त्री च्या जन्माला आले यात माझा काय दोष,
लिलाव , लिलाव , फक्त लिलाव.

लिलाव ,माझ्या शरीराचा नाही तर माझ्या
विचारांचा.
लहानपणी पाहिलेल्या त्या पावसाचा,
आई च्या मांडीवर डोक ठेवून ऐकलेल्या अंगाईचा.
आणि ,सगळ्यात मोठा लिलाव माझ्या
भावनांचा.
फक्त लिलाव , फक्त लिलाव ................................


कवी अनुप सोनवणे................