Saturday, December 26, 2009

म्हणून

कुठ्ल्या मुली शी स्वत: बोलन जमलच नाही
म्हणून माझ्या प्रेमाच मेतकूट जमलच नाही......
कृष्णा सारख बासुरी वाजवत समुद्रा किनारी
सूर्य मावळतांना,
कुणाची वाट पाहन् जमलच नाही
म्हणून माझ्या प्रेमाच मेतकूट जमलच नाही.....
रूसवे,फुगवे ,आणि नाकावरचा राग
ओळखता आलच नाही
म्हणून माझ्या प्रेमाच मेतकूट जमलच नाही.......
बोलता बोलता तिचा हात धरून तिच्या
हातात हात देणा जमलस नाही
म्हणून माझ्या प्रेमाच मेतकूट जमलच नाही......
चोरून चोरून प्रेम पत्र लिहिण,
लोकांच्या नजरा चोरून तिला भेटन जमलच नाही
म्हणून माझ्या प्रेमाच मेतकूट जमलच नाही......
म्हणून माझ्या प्रेमाच मेतकूट जमलच नाही.....


कवी :अनुप सोनवणे

चारोळ्या

तिच्या घरचा पत्ता मुद्दाम तोंडी पाठ
करून ठेवलाय
म्हणजे माझी तिरडी
आपोआप तिच्या घरासमोरून जाईल

**********************************
नाते कधी कधी नाते नसतात,
हृदयंच्या कागदावर काही शब्द असतात ,
हळूच मग अके पाऊस पडतो ,
हे शब्द पुसले जातात अलगद .
आणि राहतो तो फक्त ओला कागद ,
ओला कागद
************************************
क्षण विसरावे विसरता येईना,
वेड्या मनाला समजवता येईना,
हळूच मग अलगद अश्रू पडतात,
पडलेले अश्रू वेचता येईना....

*********************************************
ओळख जुनी पण श्ब्द नवे नवे ,
मनस तीच पण चेहरे नवे नवे ,
सूर तेच पण गाणे नवे नवे ,
चिंब पावसात वाटते कुणी तरी हवे हवे...
****************************************

प्रेमाच्या गाडीला तू होकारा ची पासिंग
देऊन टाक
विचारांचा ट्रॅफिक जाम झालाय
तू हिरवा सिग्नल देऊन टाक
*********************************
गरम वाटत होत तरी पण पंखा बंद केला
वाटल के एखादी दोरी टाकून गळफास घ्यावा,
पण तितक्यात आई चा चेहरा समोर आला
आणि जानवल की तुझ्या नाकारा पुढे
माझ्या आईला का रडवू......

Wednesday, June 3, 2009

लिलाव


या निष्पापी बाजारात माझ्या शरीराचा लीलव करून ,
पैशे मोजले जातात .
अश्रूंनी ठस ठसलेल्या माझ्या शरिराने,
मौज मस्ती चे खिशे भरले जातात .

मी वैश्या नवते, हो खरच ,
मे वैश्या नवते,

कधी तरी मी पण शाळा सुटल्यावर घरी जाताना,
प्राजक्ताकताचे फूल वेचायचे.
संध्याकाळी दिवा लावताना मी शुभंम करोती ,
म्हणायचे .

आठ वाजले, की बाबांची वाट बघत दारात
बसून राहायची .
पाऊस पडला कधी ,तर मी मैत्रीण सोबत चिंब
भिजयची.

आणि आत्ता, आठ वाजले रे वजले
आणि आत्ता ,आठ वाजले रे वजले

की सुरू होतो माझ्या शरीराचा लीलाव.
मृत्यू ला जवळून बघण्याचा ,
सुरू होतो पुन्हा एक सराव.

माणूस माणसाला विकून खातोय,
पैश्याच्या पुरणपोळीला माणुसकीची,
आमटी तोंडी लावून खातोय .

ज्या बपाची मी वाट बघायचे ,
त्यानेच मला विकून खाल्ल.
दुखाच्या विहिरित मला सरळ ढकलून दील.

मी स्त्री च्या जन्माला आले यात माझा काय दोष,
लिलाव , लिलाव , फक्त लिलाव.

लिलाव ,माझ्या शरीराचा नाही तर माझ्या
विचारांचा.
लहानपणी पाहिलेल्या त्या पावसाचा,
आई च्या मांडीवर डोक ठेवून ऐकलेल्या अंगाईचा.
आणि ,सगळ्यात मोठा लिलाव माझ्या
भावनांचा.
फक्त लिलाव , फक्त लिलाव ................................


कवी अनुप सोनवणे................

Monday, March 23, 2009

मी


मी तो सूर्य नाही जो सायंकाळी मावळेल
मी तो चंद्र नाही जो नभात दिसेल

मी एक विश्वास आहे जो नेहमी सोबत राहील
मी एक श्वास आहे जो नेहमी हृदयात राहील

मी तो इंद्रधनुष्या नाही जो फक्त पावसात दिसेल
पाऊस नसला तरी माझा गारवा सोबत असेल

मी तो बेभान वारा नाही जो सगळा काही संपवेल
मी एक शांत चालणारी हवा आहे जी सॅग्ला काही सांगेल

मी नाही मोगरा आणि गुलाबाचचा गंध
मी आहे ओल्या माती चा सुगंध

माझा त्या चंदयांशी काही संभंध नाही ज्या
फक्त रात्रीच चमकतात
माझ्या आठवणी तर अश्रूंच्या पावसात भीजतात

मी सोबत असल्याचा तुला नेहमी हुईल भास
कारण मी आहे एक विश्वास

मी आहे एक विश्वास
अनुप सोनावने

सिगरेट



होठान्मधुन आयुष्यातले काही क्षण
नाकांमधून कमी करनारी म्हणजे
सिगरेट

सोडून गेलेल्या प्रियासीला विसरव म्हणून
पेटवलेली
आणि त्याच धूक्यात तीचाच चेहरा
दाखवणारी म्हणजे
सिगरेट

कॉलेज मधले दोन मित्र भेटताना
एक कट चहा सोबत पेटवलेली म्हणजे
सिगरेट
ही माझी शेवट ची आहे अस म्हणताना बिन्दास्त्पने
पेटवलेली
आपल्याला कुठे तरी याचा त्रास होतोय याची आठवण करून देणारी म्हणजे
सिगरेट

आपल्या छातीला पोकळ कॅरणारी
माणसांना माणसांपासून दूर कॅरणारी म्हणजे
सिगरेट

दोन बोटांमधे धरलेली
दोन दमडीची ही सिगरेट
माणसाचा जीव घेऊन जाते

तरी पण हा माणूस सिगरेट माघे धावत असतो
सिगरेट साठीच आणि …….. सिगरेट मुळेच
सिगरेट सारखा जळत असतो …..
सिगरेट सारखा जलट असतो………..

अनुप सोनवणे

Sunday, March 22, 2009

मी असाच् आहे


मी असाच् आहे
चांदण्या मोजणरा मी एक वेडा आहे
प्रेमात पडणारा एक वेडा आहे
मैत्रीत जीव देणारा एक सखा आहे
मैत्री च्या पावसाचा एक गारवा आहे
मी असाच् आहे

ही रात्र अबोल असते पण या रात्रीशी
बोलणारा मी एक बोलका आहे
आयुष्य म्हणजे
बाहुल्यांचा खेळ असतो
मी या खेळ्यातला एक बाहूला आहे
उगाच मन घेऊन भाटकनारा एक
भौरा आहे
मी असाच् आहे

मी त्याचा आणि तिचा मित्र आहे
मनातल्या भावना कागदावर
उतरावणारा
एक कवी आहे

मी असाच् आहे
मी असाच् आहे

का ??????

का ?
का? मी सांगू तुला
के मझ तुझ्यावर किती प्रेम आहे
तुझ्या साठी माझा हृदय किती जळल आहे
का?
का.. मी सांगू के तुझ्या आठवणीत रात्र रात्र
जागलोय
तुझ्या आठवणीत स्वताला कुठे तरी विसरलोय
का?
का.. सांगू तुला के रात्र रात्र तुझ्या साठी चांदण्या मोजत
होतो
त्याच चांदण्यात तुला कुठेतरी शोधत
होतो
का ? का? सांगू तुला

मी तुला हे का सांगतोय ............ह
मी तुला हे का सांगतोय
तुझ्या नाही मधे माझ हो का शोधतोय

का?का ?
मी आज पण तुझी वाट बघतोय
का आज पण तुझ्या साठी झूर्तोय

अग,

आज पण मी चारोळ्या लिहितोय
तुला बघून का आज पण ,मी कविता करतोय
का ?
का?
का ??????