Saturday, December 26, 2009

म्हणून

कुठ्ल्या मुली शी स्वत: बोलन जमलच नाही
म्हणून माझ्या प्रेमाच मेतकूट जमलच नाही......
कृष्णा सारख बासुरी वाजवत समुद्रा किनारी
सूर्य मावळतांना,
कुणाची वाट पाहन् जमलच नाही
म्हणून माझ्या प्रेमाच मेतकूट जमलच नाही.....
रूसवे,फुगवे ,आणि नाकावरचा राग
ओळखता आलच नाही
म्हणून माझ्या प्रेमाच मेतकूट जमलच नाही.......
बोलता बोलता तिचा हात धरून तिच्या
हातात हात देणा जमलस नाही
म्हणून माझ्या प्रेमाच मेतकूट जमलच नाही......
चोरून चोरून प्रेम पत्र लिहिण,
लोकांच्या नजरा चोरून तिला भेटन जमलच नाही
म्हणून माझ्या प्रेमाच मेतकूट जमलच नाही......
म्हणून माझ्या प्रेमाच मेतकूट जमलच नाही.....


कवी :अनुप सोनवणे

चारोळ्या

तिच्या घरचा पत्ता मुद्दाम तोंडी पाठ
करून ठेवलाय
म्हणजे माझी तिरडी
आपोआप तिच्या घरासमोरून जाईल

**********************************
नाते कधी कधी नाते नसतात,
हृदयंच्या कागदावर काही शब्द असतात ,
हळूच मग अके पाऊस पडतो ,
हे शब्द पुसले जातात अलगद .
आणि राहतो तो फक्त ओला कागद ,
ओला कागद
************************************
क्षण विसरावे विसरता येईना,
वेड्या मनाला समजवता येईना,
हळूच मग अलगद अश्रू पडतात,
पडलेले अश्रू वेचता येईना....

*********************************************
ओळख जुनी पण श्ब्द नवे नवे ,
मनस तीच पण चेहरे नवे नवे ,
सूर तेच पण गाणे नवे नवे ,
चिंब पावसात वाटते कुणी तरी हवे हवे...
****************************************

प्रेमाच्या गाडीला तू होकारा ची पासिंग
देऊन टाक
विचारांचा ट्रॅफिक जाम झालाय
तू हिरवा सिग्नल देऊन टाक
*********************************
गरम वाटत होत तरी पण पंखा बंद केला
वाटल के एखादी दोरी टाकून गळफास घ्यावा,
पण तितक्यात आई चा चेहरा समोर आला
आणि जानवल की तुझ्या नाकारा पुढे
माझ्या आईला का रडवू......